शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आटपाडीच्या नशिबात टंचाई लाभाचा दुष्काळ! खरीप पैसेवारीवर टंचाई घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 00:12 IST

सांगली : पैसेवारी जाहीर करताना घेण्यात येत असलेला खरीप हंगामाचा आधार, पीक पाहणी अहवालावेळीच नेमकी ५० पैशांपेक्षा जादा लागलेली पैसेवारी आणि वर्षानुवर्षे यात बदल झाला नसल्याचा

ठळक मुद्देपीक कापणी प्रयोगाने केला घात

शरद जाधव ।सांगली : पैसेवारी जाहीर करताना घेण्यात येत असलेला खरीप हंगामाचा आधार, पीक पाहणी अहवालावेळीच नेमकी ५० पैशांपेक्षा जादा लागलेली पैसेवारी आणि वर्षानुवर्षे यात बदल झाला नसल्याचा फटका आटपाडी तालुक्याला बसत आहे.बुधवारी शासनाने जिल्ह्यातील २८५ गावांत मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला. मात्र, टंचाईच्या सर्वाधिक झळा सोसणाऱ्या आटपाडी तालुक्यातील एकाही गावाचा यात समावेश नाही. रब्बी तालुका यादीत असलेला समावेश आणि खरीप हंगामातील पीक कापणी प्रयोगाने आटपाडीचा घात केला आहे.

बुधवारी राज्य शासनाने जिल्ह्यातील २८५ गावांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला. दुष्काळ जाहीर केलेल्या गावात मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर व जत तालुक्यातील गावांचा समावेश आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या भागाइतकीच किंबहुना अधिक टंचाई परिस्थिती असलेल्या आटपाडी तालुक्यातील एकाही गावाचा यात समावेश नाही.याबाबत प्रशासनाशी संपर्क साधला असता, खरीप हंगामात पीक कापणी प्रयोग घेतले जातात. त्यानुसार त्या भागातील पैसेवारी ठरत असते. तो अहवाल शासनाला सादर करून टंचाई जाहीर होत असल्याचे सांगण्यात आले.आटपाडी तालुक्यात खरीप हंगामावेळी पीक कापणी प्रयोग घेण्यात आले. त्यावेळी तेथील पैसेवारी ५० पैशांपेक्षा जादा लागल्यानेच दुष्काळ जाहीर करण्यात आला नसल्याचे सांगण्यात आले. 

शास्त्रोक्त पध्दतीने पीक कापणी प्रयोग घेतले जातात, त्यानंतरच पैसेवारी ठरविली जाते. यासंदर्भात शासनाची तत्त्वे आहेत. आटपाडी तालुक्यात रब्बीच्या गावांची संख्या जास्त आहे. जाहीर झालेल्या गावांमध्ये आटपाडीचा समावेश नसला तरी तालुक्यातील अडचणी सोडविण्यास प्राधान्य देणार आहे.- विजयकुमार काळम-पाटील, जिल्हाधिकारीदुष्काळ जाहीर केलेल्या यादीत आटपाडी तालुक्याचा समावेश नाही, हे अन्यायकारक असून, याविरोधात आवाज उठविणार आहे. शासनदरबारी प्रयत्न करून आटपाडीचा समावेश करण्यासाठी आमदारांनी प्रयत्न करायला हवे होते. त्यांचे अपयश दिसून येत आहे. कामाचे जसे श्रेय आमदार घेतात, तसे या अन्यायाचेही श्रेय त्यांनी घ्यावे. तालुक्यात टंचाई असतानाही लाभ मिळणार नाहीत, यास आमदार जबाबदार आहेत.- अमरसिंह देशमुख, माजी जि. प. अध्यक्ष, आटपाडी

टॅग्स :Sangliसांगलीfarmer suicideशेतकरी आत्महत्या